आमदार एकनाथ खडसेंमुळेच जावयाला जेलवारी : भुसावळात मंत्री गिरीश महाजन


MLA Eknath Khadse should go to Jail: Bhusawlat Minister Girish Mahajan भुसावळ : माझ्यावर मोक्का कसा लावला याची कबुली खडसेंनी स्वतःहून दिली हे बरे झाले मात्र मी त्यांच्यावर कुठलेही आरोप केले नव्हते, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आरोपानंतर खडसेंची चौकशी सुरू झाली. खडसेंच्या कुटूंबाला उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानेच ते सध्या बाहेर आहेत शिवाय जावयाला अडीच वर्षानंतरही जामीन मिळालेला नाही, खडसेंमुळे जावयाला जेलवारी करावी लागली, असा आरोप राज्याचे वैद्यकीय शिक्षण व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी येथे केला. भुसावळ शहरातील जामनेर रोडवर रविवारी स्वा.सावरकरांच्या स्मारकाचे उद्घाटन आणि स्व.शांतीलाल सुराणा स्मृती पाणपोईच्या उद्घाटनानिमित्त मंत्री गिरीष महाजन भुसावळात आले असता माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते.

खडसेंच्या स्वार्थामुळेच जावयाला जेलवारी
मंत्री महाजन यांनी यावेळी पुन्हा खडसेंवर टिकेचे बाण चालवले. ते म्हणाले की, खडसेंनी माझ्यावर मोक्का लावल्याची स्वतःहून कबुली दिली हे फार बरे झाले मात्र मी कोणतेही आरोप त्यांच्यावर केले नाहीत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया यांनी केलेल्या आरोपांवरुन त्यांची ईडीसह अन्य विभागाकडून चौक्शी होवून कारवाई झाली मात्र दहावेळा सुप्रीम कोर्टात जावूनही खडसेंच्या जावयाला जामीन मिळू शकला नाही याला कारणीभूत खडसेच असून त्यांच्यामुळे जावई दोन-अडीच वर्षांपासून जेलमध्ये असल्याचे मंत्री महाजन म्हणाले. उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानेच खडसे कुटूंबातील सदस्य बाहेर असून त्यांच्यामागे पुरावे असल्याने ईडी मागे लागली आहे. सुप्रीम कोर्टापर्यंत दहावेळा जावून देखील खडसेंच्या जावयाला जामीन मिळालेला नाही, खडसेंच्या स्वार्थामुळे जावई जेलमध्ये बसला असल्याचा टोलाही महाजनांनी येथे हाणला.

आमच्यात मदभेद नाहीत
गजानन किर्तीकर यांना मिडीयाने गराडा घातल्यानंतर त्यांच्या तोंडून काही वाक्य आली मात्र राज्यातील सत्ताधारी शिंदे गट व भाजपमध्ये जागा वाटपावरुन कुठलाही वाद नाही, असेदेखील मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले. मी स्वतः
त्यांच्याशी बोलला असता त्यांनी माझी नाराजी नाही, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा आमचे नेते देवेंद्र फडणवीस हे दररोज सोबत फिरत आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये एकवाक्यता आहे यामुळे शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये जागावाटपांवरुन कोणतेही मतभेद नाहीत. रावेर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून आमदार एकनाथराव खडसेंचे नाव चर्चेत असून आपले नाव चर्चेत असल्याच्या प्रश्नावर मंत्री महाजन यांनी सावध पवित्रा घेत या सर्व कपोकल्पीत गोष्टी असल्याचे सांगत केवळ मिडीयातून या बाबी चर्चिल्या जात असल्याचे सांगितले.


कॉपी करू नका.