जळगावात भांडण सोडवताना तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला


A young man was attacked with a sharp weapon while resolving a dispute in Jalgaon जळगाव : नवरात्रोत्सवात देवी बसविण्याच्या कार्यक्रमात भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. रविवार, 15 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास कुसुंबा येथे बेलदारवाडीत ही घटना घडली. ईश्वर निवृत्ती लोहार (24, कुसुंबा) असे जखमीचे नाव आहे. संशयित निलेश कोळी (कुसुंबा) याच्याविरुध्द एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

किरकोळ वादातून हल्ला
कुसुंबा गावातील बेलदारवाडी येथे ओम साई राम मित्र मंडळाच्या देवी बसविण्याचा कार्यक्रम रविवारी सुरू होता. गावातील निलेश कोळी तसेच क्रिष्णा भालेराव यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद होवून भांडण सुरू झाले. हे भांडण सोडविण्यासाठी ईश्वर लोहार यांनी या ठिकाणी धाव घेतली. ते दोघांना समजूत घालत असताना निलेश कोळी याने त्यांना शिविगाळ करत हातातील धारदार शस्त्राने पोटावर वार केले. या घटनेत ईश्वर लोहार हे गंभीररीत्या जखमी झाले. घटनास्थळी असलेल्या तरुणांनी त्यांना तत्काळ उपचारार्थ हलविले.



घटना कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी जखमी ईश्वर लोहार यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात निलेश कोळी याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख करत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !