49 वर्षीय शेतकर्याचा विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू
धरणगाव : धरणगाव तालुक्यातील बांभोरी बुद्रुक येथील 49 वर्षीय शेतकर्याचा विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अमृत अर्जुन पाटील (49, बांभोरी बुद्रुक, ता.धरणगाव) असे मयताचे नाव आहे.
पाय घसरून पडल्याने मृत्यू
अमृत पाटील हे त्यांचे बांभोरी शिवारातील शेत गट नंबर 107 मधील शेतातील विहिरीजवळ पाणी घेण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांचा पाय घसरल्याने ते विहिरीत पडल त्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. परिसरातील शेतकर्यांनी धाव घेऊन त्यांना बाहेर काढत धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषित केले. याप्रकरणी शनिवारी धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या संदर्भातील पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल खुशाल पाटील करीत आहे.

