मोठी बातमी : ‘लोकसभा’ निवडणुकांची या तारखेला होणार घोषणा !


Big news: ‘Lok Sabha’ elections will be announced on this date ! नवी दिल्ली :आगामी लोकसभा निवडणुकांकडे जनतेचे लक्ष लागले असतानाच लोकसभा निवडणुकीबाबत मोठी अपडेट बातमी समोर आली आहे. मार्च महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आोयागाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होणार असल्याची शक्यता आहे तर 14 मार्च 2024 रोजी निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणूक तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे. गत निवडणुकीप्रमाणे यंदाही सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया होणार असल्याचे समजते.

सात टप्प्यात होणार निवडणुका
जून 2024 मध्ये 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण होणार असल्याने निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 14 मार्च रोजी निवडणूक तारखांची घोषणा होईल. सात टप्पांत होत असलेल्या मतदान प्रक्रियेची सुरुवात एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मे महिन्यात निवडणूक निकाल घोषित केला जाईल.

जागा वाटपासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न
निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता घोषित होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी असल्याने एनडीए आणि इंडिया आघाडीकडून जागावाटपासाठी वेगवान प्रयत्न केले जात आहे. भाजपने आघाडी घेत आपल्या उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे. दुसरीकडे, विरोधकांच्या आघाडीत यंदा नवीन पक्ष सामील झाल्याने जागावाटपासाठी उशीर होत असून याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी काँग्रेसच्या निवडणूक समितीची लवकरच बैठक होणार आहे.

भाजपाच्या उमेदवारीकडे राज्याचे लक्ष
भाजपने देशभरातील आपल्या 195 उमेदवारांची नावे जाहीर केली असली तरी अद्याप महाराष्ट्रातील एकाही जागेवर उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष सोबत आल्याने जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम असून भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शाह सध्या दोन दिवसीय महाराष्ट्रावर दौर्‍यावर आहेत. अमित शाह यांच्या या दौर्‍यात जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

 


कॉपी करू नका.