मोठी बातमी : एसबीआयकडून निवडणूक आयोगाला रोख्यांचा तपशील सादर


Big news : SBI submits details of bonds to Election Commission नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवार, 21 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एसबीआयला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे बजावल्यानंतर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात एसबीआयने प्रतिज्ञापत्र दाखल केले असून 18 मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार, निवडणूक रोख्यांचा (Electoral Bonds) संपूर्ण तपशील निवडणूक आयोगाला दिल्याचे त्यात नमूद केले आहे.

वेबसाईटवर अपलोड होणार माहिती
एसबीआयने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, बँकेचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांनी म्हटले की, 18 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्यांनी बाँड खरेदी केलेल्या व्यक्तीचा तपशील, बाँड क्रमांक आणि रक्कम, बाँड कॅश करणार्‍या पक्षाचे नाव, किती रुपयांचा बाँड होता, राजकीय पक्षाच्या बँक खात्याचे शेवटचे 4 क्रमांक इत्यादी माहिती निवडणूक आयोगाकडे सोपवली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोग ही सर्व माहिती आपल्या वेबसाईटवर टाकेल.


कॉपी करू नका.