शहादा तालुक्यात भर दिवसा दरोडा : पिस्टलाच्या धाकावर 65 लाखांचे दागिने एक किलो सोने लुटले

चालकासह मुनीमाला ठेवले ओलीस : भरदिवसा पडलेल्या दरोड्याने खळबळ


Broad daylight robbery in Shahada taluka : Jewelry worth 65 lakhs and one kg of gold stolen at gunpoint शहादा : दागिण्यांची डिलीव्हरी करण्यासाठी निघालेल्या सराफा दुकानातील चालकासह मुनीमाला पिस्टल व चाकू लावून ओलीस ठेवत दरोडेखोरांनी सुमारे 65 लाखांचे एक किलो दागिने लुटल्याची धक्कादायक घटना शहादा तालुक्यातील बोरद बायपास रस्त्यावरील तर्‍हाडी ते ठेंगचे गावादरम्यान शनिवार, 24 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली. भरदिवसा पडलेल्या दरोड्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात खळबळ उडाली असून दरोडेखोरांचा शहादा पोलीस व नंदुरबार गुन्हे शाखेकडून कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

भर दिवसा पडला दरोडा
खास सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवार, 23 मार्च रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शहादा शहरातील संजय सोनार यांच्या मालकीच्या पार्थ ज्वेलर्स दुकानातून त्यांचे मुनीम विलास बर्डे (रा.टवळाई, ता.शहादा) व चालक प्रकाश कापुरे (रा. शहादा) हे नेहमीप्रमाणे फोर्ड कंपनीची इकोस्पोर्ट गाडी (क्र. एम.एच. 39 जे 8138) ने तळोदा, अक्कलकुवा, खापर या ठिकाणावरील व्यापार्‍यांना सोन्याचे दागिने व सोने देण्यासाठी निघाले. सर्वप्रथम तळोदा या ठिकाणी जायचे असल्याने ते आपल्या नेहमीच्या रूटने शहादा येथून निघाल्यानंतर ते पिंगाणे मार्गे बोरद बायपास रस्त्याने निघाले. हे नेहमीचे काम असल्याने ते जात असताना साडेदहा वाजेच्या सुमारास तर्‍हाडी ते ठेंगचे या गावादरम्यान तीव्र वळणावर एक काळ्या रंगाची बनावट नंबर असलेली इकोस्पोर्ट गाडीने त्यांच्या वाहनाला अडविले. या वाहनात चार संशयीत होते पैकी तिघांनी खाली उतरत मुनीम विलास याला दार उघडवायला लावून त्यांच्या कानाला पिस्टल लावले तर दोघांना त्यांनी दम दिला की काहीही हालचाल केली व आरडा ओरड केली तर आम्ही तुम्हाला येथेच शूट करून टाकू.

शहाद्यात वृत्त धडकताच खळबळ
दरोड्यानंतर मुनीम विलास व ड्रायव्हर प्रकाश हे दोघे शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शहादा येथे पोहोचले. त्यांनी संपूर्ण घटनाक्रम मालक संजय सोनार यांना सांगितला. संजय सोनार यांनी याबाबत आपल्या नातेवाईकांसह व्यापारी असोसिएशन व सराफा असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांना घटनेची माहिती दिली. सुमारे एक किलो 300 ग्रॅम सोने व दागिने लुटुन नेल्याप्रकरणी मालक संजय सोनार यांनी शहादा पोलिसात पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करत जिल्हा पोलीस प्रमुख श्रवण दत्त व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक किरण खेडकर यांना घटनेची माहिती दिली. नंदुरबार गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण खेडकर व कर्मचार्‍यांनी शहादा येथे तत्काळ येऊन या प्रकरणी तपास सुरू केला आहे.


कॉपी करू नका.