उद्धव ठाकरे मैदानात : 17 उमेदवारांची यादी केली जाहीर


Uddhav Thackeray field : List of 17 candidates announced मुंबई : महाविकास आघाडीकडून 22-16-10 अशी जागावाटप ठरल्याचे सांगितले जात होते. पण आज ठाकरे गटाने थेट 17 जणांच्या नावांची यादी जाहीर केली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही यादी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केली आणि उमेदवारांची माहिती दिली आहे.

यादीत 16 नावे मात्र उमेदवारी 17 जणांना
खासदार संजय राऊत यांनी खेळी करत आपल्या ट्विटमध्ये 16 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. परंतु, ट्विटच्या कॅप्शनमध्ये त्यांनी मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर झाल्याची घोषणा केली आहे. यामुळे आता काँग्रेसची अडचण वाढली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला 21 जागा सुटल्या असल्याची चर्चा आहे. यामुळे अजून 4 जागा जाहीर व्हायच्या बाकी आहेत. तर मविआसोबत आघाडी न झाल्याने उरलेल्या जागा, रासपला आणि राजू शेट्टींना देऊ केलेली जागा कोणाच्या पारड्यात जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या जागा काँग्रेसकडे जातात की शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जातात, यावर पुढचे राजकारण अवलंबून आहे.

ठाकरे गटाकडून जाहीर झालेले 17 उमेदवार
बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख
मावळ – संजोग वाघेरे-पाटील
सांगली – चंद्रहार पाटील
हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
धाराशिव – ओमराजे निंबाळकर
शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे
नाशिक – राजाभाई वाजे
रायगड – अनंत गीते
सिंधुदुर्ग-रत्नागिरी – विनायक राऊत
ठाणे – राजन विचारे
मुंबई-ईशान्य – संजय दिना पाटील
मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत
मुंबई-वायव्य – अमोल कीर्तिकर
परभणी – संजय जाधव
मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई


कॉपी करू नका.