पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाईल लांबवला : रेकॉर्डवरील आरोपी देवपूर पोलिसांच्या जाळ्यात


Handed over mobile on the pretext of asking for address : Accused on record in Deopur police net धुळे : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने परप्रांतीय तरुणाकडील महागडा मोबाईल लांबवण्याची घटना शहरात मंगळवारी घडली होती. याप्रकरणी देवपूर पोलिसांनी तपासचक्रे फिरवत अवघ्या काही तासात दोन आरोपींना अटक केली आहे. अक्षय सुरेश चव्हाण (25, रा.दैठणकर नगर वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे) व दीपक मारुती धनले (25, रा.इंदिरानगर गोंदुररोड, देवपूर, धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. संशयितांकडून चोरी केलेला मोबाईल जप्त करण्यात आला.

धूम स्टाईल लांबवला मोबाईल
अरुण अनिल चौधरी (22, रा.महेदगाव, ता.सेंधवा, जि.बडवाणी, हल्ली मुक्काम गायत्रीनगर 55/2 व देवरे हॉस्पीटल समोर, देवपूर, धुळे) हा तरुण देवरे हॉस्पीटल समोरील कानुश्री रसवंती समोर उभा असताना दोन तरुणांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याच्याकडील दहा हजारांचा मोबाईल लांबवला होता. तरुणाने देवपूर पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्याकडे याबाबत तक्रार करताच तपासचक्रे फिरवण्यात आली. डीबीचे हवालदार पंकज चव्हाण व कॉन्स्टेबल सौरभ कुटे यांनी आरोपींना पांझरा नदी किनार भागातून अटक केली. आरोपींच्या ताब्यातून चोरीस गेलेला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एम.एच.18 सी.सी. 1031) जप्त केली. आरोपींकडे आणखी एक मोबाईल सापडल्याने तो देखील जप्त करण्यात आला. दोघे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहा. पोलीस अधीक्षक ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, इंदवे, हवालदार पंकज चव्हाण, हवालदार वैसाणे, सौरभ कुटे तसेच एलसीबीचे संजय पाटील, हवालदार एस.एम.सुरसे, जगदीश सूर्यवंशी आदींनी केली.


कॉपी करू नका.