यावल शहरातील लक्ष्मी नारायण मंदीरात रंगपंचमी उत्सवाला सुरूवात


Rangpanchami festival begins at Lakshmi Narayan temple in Yaval city यावल : शहरातील श्री लक्ष्मी नारायण मंदीरात रंगपंचमी उत्सवाला बुधवारपासून सुरूवात झाली. 27 ते 31 मार्च या काळात उत्सव साजारा होत आहे आहे. 30 रोजी श्री लक्ष्मी नारायणांचा वर्धापनदिन साजरा केला जातो यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तुकाराम बीज ते एकनाथ षष्ठी असा हा कार्यक्रम असून दररोज रात्री 8.30 वाजता विविध भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम होईल. शनिवार, 30 रोजी रंग पंचमीच्या दिवशी श्री लक्ष्मी नारायण मंदीराच्या वर्धापन दिन असल्याने लक्ष्मी नारायण भगवंतांच्या मुर्तीला अभिषेक, पूजा, आरती, सत्यनारायण पूजा आदी कार्यक्रम होतील.

असे आहेत कार्यक्रम
बुधवार, 27 रोजी बोरावल येथील भजनी मंडळाचे भजन व आरती झाली. गुरुवार, 28 रोजी यावल येथील चिरमाडे ताई याच्या मंडळाचे भजन तर शुक्रवार, 29 रोजी यावल येथील रमाबाई बडगुजर भजनी मंडळ व शनिवार, 30 रोजी श्री लक्ष्मी नारायण मंदिरातर्फे भजनी मंडळाचा कार्यक्रम तसेच रविवार, 31 मार्च रोजी वहिवाले यांच्या वही गायनाचा कार्यक्रम होईल. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुष्पा सराफ, श्रीकांत सराफ यांनी केले आहे.


कॉपी करू नका.