प्रवाशांनो ही बातमी तुमच्यासाठी : बलिया, गोरखपूर, मडगाव, नाशिक – बडनेरा विशेष गाडयांच्या कालावधीत वाढ


भुसावळ  : रेल्वे गाड्यांना होत असलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून बलिया, गोरखपूर, मडगाव, नाशिक बडनेरा या गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. भुसावळसह विभागातील विविध रेल्वे स्थानकांवरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना या गाड्यांचा फायदा होणार असून जागेचा प्रश्न मिटणार आहे.

रेल्वे प्रवाशांना गर्दीच्या कालावधीत दिलासा
रेल्वेतर्फे रेल्वे गाड्यांचा कालावधी वाढविला आहे, यामुळे भुसावळ विभागासह विभागातील विविध रेल्वे स्थानकावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना या गाड्यांचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे बडनेरा-नाशिक ही गाडी प्रवाशांना अधिक फायदेशीर आहे. रेल्वेने मुदत वाढ केलेल्या रेल्वे गाड्यामध्ये 01025 दादर ते बलिया विशेष गाडीला 30 जून 2024 पर्यंत तर 01026 बलिया ते दादर विशेष गाडीला 3 जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. 01027 दादर ते गोरखपूर विशेष गाडीला 30 जून 2024 पर्यंत तर 01028 गोरखपूर ते दादर विशेष गाडीला 2 जुलैपर्यत मुदतवाढ मिळाली आहे. 01139 नागपूर ते मडगांव द्वि -साप्ताहिक गाडी 8 जून 2024 पर्यंत तर 01140 मडगाव ते नागपूर द्वि -साप्ताहिक गाडी 9 जूनपर्यंत चालविण्यात येणार आहे. 01211 बडनेरा ते नाशिक ही गाडी 31 ऐवजी 30 जूनपर्यंत चालविण्यात येईल 01212 नाशिक ते बडनेरा ही गाडी 30 जुनपर्यंत धावणार आहे. प्रवाशांंनी या विशेष रेल्वे गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


कॉपी करू नका.