यावल तहसीलमधून डंपरची चोरी : एका आरोपीला अटक


Dumper theft from Yaval Tehsil : One accused arrested यावल : यावल तालुक्यातील किनगाव येथे अवैद्य गौण खनिज वाहतूक करणारे वाहन महसुलच्या गस्ती पथकाने पकडले होते मात्र वाळू माफियांनी सोमवार, 18 मार्च रोजी पहाटे तीन जणांनी तहसील कार्यालयाचे मुख्य गेटचे कुलूप तोडून तसेच सीसीटीव्ही कॅमेर फोडून वाहन लांबवले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर यावल पोलिसांनी एका संशयीतास अटक केली. संशयिताला यावल न्यायालयात हजर केले असता त्यास 28 मार्चपर्यंत एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. विठ्ठल कोळी (रा.रिधूर, ता.जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

असे आहे चोरी प्रकरण
किनगाव, ता.यावल परिसरात 17 मार्च 2024 रोजी रात्री तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी वसीम तडवी, शरीफ तडवी, ईश्वर कोळी, मिलिंद कुरकुरे, कोतवाल समीर तडवी हे महसूल विभागाचे अवैध गौण खनिज वाहतूक विरोधी पथक गस्तीवर असताना त्यांना विना क्रमांकाचे वाहन गौण खनिजाची वाहतूक करताना आढळल्याने पथकाने वाहन जप्त करीत तहसील आवारात लावले. मात्र सोमवार, 18 मार्च रोजी पहाटे भूषण विठ्ठल कोळी, विठ्ठल भाऊलाल कोळी व स्वप्नील तुषार कोळी यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात मुख्य गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटिव्हीचा कॅमेर्‍यापैकी एक कॅमेरा फोडून वाहन चोरी केले होते. याप्रकरणी कोतवाल गणेश रमेश वराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात संशयीत आरोपी विठ्ठल कोळी (रा.रिधूर, ता.जळगाव) यांना अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वसीम तडवी करीत आहेत.


कॉपी करू नका.