शिरसोलीत शिवजयंती मिरवणुकीला गालबोट : दगडफेकीत होमगार्डसह सहा जखमी


Shirsooli Shiv Jayanti procession defaced : Six injured including home guard in stone pelting जळगाव : जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे शिवजयंतीनिमित्त मिरवणूक सुरू असताना अज्ञात समाजकंटकांनी तुफान दगडफेक केल्याने यात होमगार्डसह सहा नागरीक जखमी झाले. ही घटना गुरुवार, 28 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास वराड गल्लीत घडली. घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. आतापर्यंत दहावर संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

अचानक केली दगडफेक
जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथे दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येते. गुरुवार, 28 मार्च रोजी देखील संध्याकाळी शिरसोली प्र. बो. येथील इंदिरा नगर येथून मिरवणूक ढोलताश्यांच्या गजरात वाजत गाजत निघाली होती. रात्री आठ वाजता वराड गल्लीजवळून मिरवणूक सुरू असताना अचानक दगडफेक सुरू झाली. या घटनेत होमगार्ड पंकज सापकर, विशाल दिलीप पाटील, निलेश भगवान पाटील, विशाल ज्ञानेश्वर बारी, मंगेश साहेबराव पाटील आदी जखमी झाले.

परीस्थिती नियंत्रणात
एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच निरीक्षक बबन आव्हाड हे घटनास्थळी सहकार्‍यांसह दाखल झाले. त्यासोबत दंगा नियंत्रण पथकाने घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळी अजूनही पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत दाखल झाले. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


कॉपी करू नका.