शिरसाड चोरी प्रकरण : जळगावातील आरोपीची कोठडीत रवानगी


Shirsad theft case : Accused sent to custody in Jalgaon यावल : यावल तालुक्यातील शिरसाड येथे पानटपरीत चोरी करताना फैजान उर्फ दानिश खान आरीफ खान (19, रा.तांबापुरा, जळगाव) याला पकडण्यात आले होते तर चौघे साथीदार मात्र पसार झाले होते. आरोपीला सोमवारी यावल न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती व बुधवारी संशयिताने चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पुन्हा एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

आरोपी न्यायालयीन कोठडीत
गुरुवारी कोठडीची मुदत संपताच न्यायालयात प्रथमवर्ग न्यायाधीश एस.बी.वाळके यांच्या न्यायासनासमोर हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, सहायक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे. दरम्यान, बुधवारी हिहरकणी कक्षातील आरश्यात पाहून आरोपी आपले केस सावरत असताना त्याने केस सावरल्यानंतर न्यायधिशांनी त्यास खडसावले व शिस्तीच्या सुचना केल्या. आरोपीने चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी त्यास पुन्हा एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


कॉपी करू नका.