ट्रॅफिक ब्लॉक : महाराष्ट्र एक्स्प्रेस उद्यापासून दोन दिवस पुण्यापर्यंत धावणार


Traffic block: Maharashtra Express will run to Pune for two days from tomorrow भुसावळ : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे आणि मिरज विभागातील जरंडेश्वर आणि सातारा स्थानकांदरम्यान दुहेरीकरण सुरू करण्यासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक 31 रोजी घेण्यात येत असल्याने गाडी क्रमांक 11040 गोंदिया-कोल्हापूर एक्सप्रेस 30 रोजी पुणे स्थानक येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली असून ही गाडी कोल्हापूरपर्यंत धावणार नाही तर गाडी क्रमांक 11039 कोल्हापूर -गोंदिया एक्सप्रेस प्रवास 31 रोजी पुणे स्थानकावरून आपल्या नियोजित वेळेत सुटेल. ही गाडी कोल्हापूर ते पुणे दरम्यान रद्द राहणार आहे.

गाडी क्रमांक 22686 चंडीगढ-यशवंतपूर एक्सप्रेस 30 रोजी मनमाड, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, मिरजमार्गे वळवण्यात येईल. ही गाडी पुणे ते मिरज दरम्यान रद्द राहणार आहे. प्रवाशांनी दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


कॉपी करू नका.