खंडेराव महाराजांच्या जयघोषात ओढल्या बारागाड्या


सिंगनूर : येथून जवळच असलेल्या मांगलवाडी येथे खंडेराव महाराजांच्या यात्रेत तांदलवाडी, बलवाडी दसनूर,यांसह परिसरातील ग्रामस्थांनी सहभाग घेतला. यात्रेच्या दिवशी बुधवार, 27 रोजी सकाळी खंडोबा मंदिरात विधीवत पूजा झाली. सायंकाळी पाच वाजेला परंपरेनुसार खंडेराव महाराजांच्या जयघोषात बारागाड्या ओढण्यात आल्या.

खंडेराव महाराजांचा जयघोष
जगन्नाथ तायडे (भगत) हे गेल्या 20 वर्षांपासून बारागाड्या ओढत आहेत. त्यांना सोपान तायडे, दिलीप तायडे, रमेश तायडे, रवींद्र तायडे, मुरलीधर तायडे, तुळशीराम तायडे, लक्ष्मण तायडे, नामदेव तायडे, उखा तायडे, त्र्यंबक तायडे यांनी सहकार्य केले. यात्रेत पाळणे, खेळणी, विविध खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने थाटण्यात आली होती. ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशाचे आयोजनही करण्यात आले. निंभोरा पोलीस स्टेशनचे सहा.निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. सरपंच कमल बोरसे, उपसरपंच रंजना तायडे, पोलीस पाटील दीपक तायडे यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले.


कॉपी करू नका.