शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने जळगावातील महिला प्राध्यापिकेला एक कोटींचा गंडा


A female professor in Jalgaon was cheated of Rs 1 crore by the lure of investing in the stock market जळगाव : ट्रेडींगमध्ये पैसे गुंतवल्यास जादा आमिष मिळेल असे सांगून जळगावातील महिला प्राध्यापिकेला तब्बल एक कोटींचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. जळगाव सायबर पोलिसात याप्रकरणी भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
जळगावातील एका भागात 34 वर्षीय महिला प्राध्यापिका वास्तव्यास आहेत. 16 फेब्रुवारी ते 28 मार्च 2024 दरम्यान महिला प्राध्यापिकेच्या मोबाईलवर डीजीएसव्हीआयपी-4 या ग्रुपला जोडून 7061034586, 919430938415, डॉ.बेहरूज 917667398005 या क्रमांकावरून भामट्यांनी संपर्क साधत ट्रेडींगमध्ये पैसे गुंतवल्यास जादा नफा मिळेल, असे आमिष दाखवले. फिर्यादीचे पती, नणंद व सासु यांच्या विविध बँक खात्याद्वारे एक कोटी पाच लाख 23 हजार 341 रुपये आरोपींनी स्वीकारले तसेच वेळोवेळी धमकीदेखील दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिला प्राध्यापिकेने जळगाव सायबर पोलिसात तक्रार नोंदवली. तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.

नागरीकांना सतर्कतेचे आवाहन
सायबर भामटे विविध टास्क देवून तसेच शेअर बाजारात जादा नफा मिळेल, असे सांगून विविध लिंकद्वारे तक्रारदारांची फसवणूक करीत आहेत. नागरीकांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता गुंंतवणूक करू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.


कॉपी करू नका.