नवनीत राणांचे वाढले टेन्शन : प्रहारकडून दिनेश बूब यांना उमेदवारी


Navneet Rana’s increased tension : Dinesh Bub’s candidacy from Prahar अमरावती : बच्चू कडू यांचा विरोध डावलून भाजपाने अमरावतीत नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानंतर बच्चू कडू यांनी आता राणा यांच्या विरोधात उमेदवार उभा केला आहे. प्रहारने या लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटातून आलेल्या दिनेश बूब यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

प्रहार देणार कडवी झुंज
प्रहारचे आमदार राजकुमार पटेल म्हणाले की, प्रहारच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. अमरावतीत संघटनेने उमेदवार उतरावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. माझ्यावर बच्चू कडूंनी जबाबदारी दिली. अमरावतीत मैत्रीपूर्ण लढत लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. दिनेश बूब यांनी निवडणुकीत उभं राहण्याचा निर्णय घेतला. अमरावती लोकसभा मतदारसंघातून प्रहारचे उमेदवार असतील अशी घोषणा मी करतो असं त्यांनी सांगितले.

दिनेश बूब हे इच्छुक उमेदवार होते. शिवसेना ठाकरे गटाने ही जागा काँग्रेसला दिली. दिनेश बूब यांना प्रहारचे उमेदवार म्हणून मैदानात उतरवत आहोत. बूब यांच्याबाबत मतदारसंघात सकारात्मक वातावरण आहे. अमरावती मतदारसंघात 2 आमदार आहेत. आम्हाला लोकसभेची एक जागा हवी होती. महायुतीत आम्ही एक जागा मागितली तर चुकीचे काय? पक्ष वाढावा असं सगळ्यांनाच वाटते असं आमदार राजकुमार पटेल यांनी म्हटलं.


कॉपी करू नका.