17 लाखांचे दागिणे घेवून जळगावातून बंगाली कारागीर भुर्रर


A Bengali craftsman from Jalgaon fled after taking jewelery worth 17 lakhs जळगाव  : सराफा बांधवांकडून दागिणे घडवण्यासाठी आणलेले तब्बल 256 ग्रॅम वजनाची व बाजारमूल्यानुसार 17 लाख रुपये किंमतीचे सोने घेवून जळगावातून बंगाली कारागीर पसार झाल्याने जळगावातील सराफा बांधवांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलिसात शेख अमीरूल हुसेन (28, मंडूलीका बाजार, आयरीपुता, ता.जगत वल्लभपूर, जि.हुगली, राज्य पंश्चिम बंगाल, ह.मु.जोशी पेठ, जळगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
जळगावातील सराफा व्यापारी शुभम प्रदीप वर्मा (30, लक्ष्मी नगर, जळगाव) आणि खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा (जळगाव) यांनी ंगाली कारागीर यांच्याकडे सोन्याचे बिस्किट व तुकडे देऊन दागिने घडवण्याचे काम दिले होते. त्यांनी बुधवार, 27 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता बंगाली कारागीर शेख अमीरूल हुसेन (28, मंडूलीका बाजार, आयरीपुता, ता.जगत वल्लभपूर, जि.हुगली, राज्य पंश्चिम बंगाल, ह.मु.जोशी पेठ, जळगाव) याला 15 लाख रुपये किंमतीची 254 ग्रॅम सोन्याची लगड आणि दोन लाख रुपये किंमतीचे 31 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट असे एकूण 17 लाखांचे सोने दागिणे बनविण्यासाठी दिले.

बंगाली कारागीर अमीरूल हुसेन याने दिलेल्या सोन्याच्या लगड व बिस्कीट याचे दागिने न बनवता 17 लाखांचे सोने घेऊन पसार झाला. हा प्रकार गुरुवार, 28 रोजी उघडकीस आला. सोन्याचे व्यापारी शुभम वर्मा आणि खेतेंद्र शर्मा यांनी शनीपेठ पोलिसात धाव घेत बंगाली कारागीर शेख अमीरूल हुसेन याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके हे करीत आहे.


कॉपी करू नका.