नशिराबाद येथे गोदामात छापेमारी : 58 लाखांचा गुटखा जप्त : दोघांना बेड्या


Raid in godown in Nashirabad : Gutkha worth 58 lakhs seized : Two handcuffed नशिराबाद  : अन्न व औषध प्रशासनाने गोपनीय माहितीच्या आधारे नशिराबाद येथील उमाळा रोडवरील एका गोदामातून तब्बल 58 लाख 27 हजार 900 रुपये किंमतीचा सुगंधित पान मसाला, गुटखा, तंबाखू जप्त केल्याने गुटखा तस्कर हादरले आहेत. या प्रकरणी सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
नशिराबाद येथील उमाळा रोडवरील गट नंबर 20 मधील एका गोडावूनमध्ये बेकादेशीररित्या सुगंधित पान मसाला, गुटखा, तंबाखू यांची साठवणूक करण्यात आल्याची माहिती जळगाव येथील अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. अन्न औषध प्रशासन अधिकारी शरद पवार यांच्यासह पथकाने नशिराबाद पोलिसांच्या मदतीने गुरुवार, 28 मार्च रोजी दुपारी 12 वाजता गोडावूनवर छापा टाकला. या कारवाईत पथकाने एकूण 58 लाख 27 हजार 900 रुपये किंमतीचा सुगंधित पान मसाला, गुटखा आणि तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला आहे.

यांच्याविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिथुन कुमार श्याम भूषण सहानी (20), अजय कुमार कापुरी सहानी (18, दोन्ही रा.किशन वाडा), पसार ट्रक चालक अब्दुल जहीर खान (राजीव नगर, खजराणा, इंदौर, मध्यप्रदेश), वाहन मालक बलवीर सिंग बग्गा (मध्य प्रदेश, इंदौर), गोडावून मालक व मामा नामक इसम (पूर्ण नाव माहित नाही) अशा सहा जणांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. यातील मिथुन कुमार सहानी आणि अजयकुमार सहानी या दोघांना ताब्यात घेण्यात आले. तपास सहा.निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घायतळ करीत आहे.


कॉपी करू नका.