चाळीसगावातील टोळीप्रमुखासह दोघे सहा महिन्यांसाठी हद्दपार

टोळीप्रमुखासह दोघांविरोधात दहा गुन्हे : पोलीस अधीक्षकांचे आदेश


The two along with the gang leader of Chalisgaon were deported for six months चाळीसगाव : चाळीसगाव शहरातील दोघा कुविख्यात संशयीतांना जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सहा महिन्यांसाठी हद्दपार केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. टोळीप्रमुख जगदीश जगन्नाथ महाजन (51) व दादू उर्फ विशाल जगदीश महाजन (23 दोघे रा.नेताजी पालकर चौक, चाळीसगाव) अशी हद्दपार संशयीतांची नावे आहेत. आरोपींविररोधात चाळीसगाव पोलीस स्टेशनला खून, खुनाचा प्रयत्न, दंगल करणे, घातक हत्यार असे एकूण 10 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

गुन्हेगारी वर्तुळात खळबळ
दोन्ही संशयीत आरोपींना हद्दपार करण्याबाबत चाळीसगाव शहर पोलिसांनी प्रस्ताव तयार केला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांचा सामाजिक उपद्रव निष्पन्न झाल्याने त्यांना जळगाव जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हद्दपार केले आहे.

यांनी केली कारवाई
हद्दपारीचा प्रस्ताव चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, हवालदार विनोद भोई, नाईक तुकाराम चव्हाण, महेंद्र पाटील आदींनी तयार करून पोलीस अधीक्षकांकडे सादर केला. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सहा महिन्यांसाठी आरोपींना हद्दपार केले. हद्दपार प्रस्तावाचे कामकाज गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, पोलीस अंमलदार एएसआय यूनुस शेख इब्राहिम, हवालदार सुनील पंडीत दामोदर यांनी पाहिले.


कॉपी करू नका.