यावल तालुक्यातील चार शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्माल


यावल : यावल तालुक्यातील चार शिक्षकांचा कोल्हापूर येथे राजर्षी शाहू स्मारकात राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने नुकतेच सन्मानीत करण्यात आले. हा कार्यक्रम अविष्कार फाऊंडेशनकडून घेण्यात आला. ग्रामीण भागात ज्ञानदानासह विविध शैक्षणिक उपक्रम राबवल्याबद्दल या चार ही शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. कोल्हापूर येथे राजर्षी शाहू स्मारकात राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम पार पडला. त्यात यावलमधील ज्योती मोटे-जाधव, अर्चना कोल्हे, आरिफ तडवी व शेख फारुकी या चार शिक्षक बांधवांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षस्थानी इस्रोचे अभियंता नगिनभाई प्रजापती होते. राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार यांच्याहस्ते या शिक्षकांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमास यावलचे गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके, गट समन्वयक महंमद तडवी यांचीदेखील उपस्थिती होती. यावल तालुक्यातील चार शिक्षक बांधवांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल यावल तालुक्यातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


कॉपी करू नका.