भुसावळकरांची चिंता आणखीन वाढली : महिलेसह मुलाला कोरोनाची बाधा


जिल्ह्यात गुरुवारी सहा बाधीत रुग्ण आढळले : भुसावळातील बाधीतांची संख्या पोहोचली आठवर तर जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 37 वर

जळगाव : जळगाव जिल्ह्यात पुन्हा सहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. गुरुवारी रात्री प्राप्त कोरोना तपासणी अहवालानुसार जिल्ह्यातील 68 संशयीत रुग्णांपैकी 62 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आले असून उर्वरीत सहा रुग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. कोरोना बाधीतांमध्ये भुसावळातील शांती नगर परीसरातील 38 वर्षीय महिलेसह तिचा 15 वर्षीय मुलगा व जळगावच्या जोशी पेठेसह पाचोरा, अमळनेर तसेच अडावद, ता.चोपडा येथील एकाचा समावेश आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या पोहोचली 37 वर
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 37 झाली असून यापैकी दहा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे. गुरुवारी रात्री प्रशासनाला मिळालेल्या अहवालानुसार 68 पैकी 62 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून सहा व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आले आहेत.

भुसावळात बाधीतांची संख्या पोहोचली आठवर
भुसावळात आतापर्यंत आठ कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळले असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी सायंकाळी शहरातील 38 वर्षीय महिलेचा पॉझीटीव्ह अहवाल आल्यानंतर या महिलेच्या 15 वर्षीय बालकालादेखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, शहरातील समता नगर, पंचशील नगर, डॉ.आंबेडकर नगर या भागात प्रत्येकी एक तर जामनेर रोडवरील सिंधी कॉलनी भागात दोन तर शांती नगर भागात यापूर्वी एक व गुरुवारी पुन्हा दोन पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण बाधीतांची संख्या आठ झाली आहे. पैकी दोघांचा मृत्यू ओढवला आहे.

भुसावळात वाढतोय कोरोनाचा फैलाव
भुसावळात आतापर्यंत सहा रुग्णांना कोरोनाची बाधी झाली होती तर त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे मात्र आता पुन्हा गुरुवारी 38 वर्षीय महिला व तिचा 15 वर्षीय मुलगा बाधीत झाल्याने भुसावळकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. यापूर्वी शहरातील समता नगर, पंचशील नगर, सिंधी कॉलनी व शांती नगर भागात कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण वाढल्याने हा परीसर प्रशासनाने सील केला आहे.


कॉपी करू नका.