ऑनलाईन पेन्शन अदालतीत 108 तक्रारींचे निरसन
भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या तक्रारींसंदर्भात मंगळवारी मंडळ रेलवे प्रबंधक कार्यालयात द्वितीय ऑनलाइन पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले. अदालतीत 108 तक्रारींचे निरसन करण्यात आले. 10 लाख 48 हजार 785 रुपये रकमेचे वाटप करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
पेन्शन अदालतसाठी मुख्य न्यायाधीश म्हणून डीआरएम विवेककुमार गुप्ता, मंडळ रेल प्रबंधक मनोजकुमार सिन्हा, अपर मंडळ रेल प्रबंधक तसेच लेखा व कार्मिक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक वरीष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांनी केले. सूत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी राजेंद्र परदेशी यांनी केले. नाशिक पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एस.जी.कुलकर्णी यांनी पेन्शनधारक व प्रशासनाच्या समस्या निवारणा संबंधी सकारात्मक भूमिकेचे कौतुक केले. आभार सहाय्यक कार्मिक अधिकारी बी.एस.रामटेके यांनी मानले. यशस्वितेसाठी सेटलमेंट आणि लेखा विभागातील तसेच सर्व कल्याण निरीक्षक व कर्मचार्यांनी आदींनी परीश्रम घेतले.


