राष्ट्रवादीला विरोध नाही : जगन सोनवणे


भुसावळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आमचा कदापि विरोध नाही मात्र वरणगाव पाणीपुरवठा योजनेला विरोध करणार्‍या राष्ट्रवादीचे नगरसेवक राजेंद्र विश्‍वनाथ चौधरी यांना आपला विरोध असल्याची माहिती पीआरपीचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही मरेपर्यंत राष्ट्रवादी पक्षाला विरोध करू शकत नाही, कारण खासदार शरद पवार यांच्या परीवाराशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध असून हा परीवार ग्रेट आहे मात्र पक्ष विरोधी असलेल्या लोकांविरुद्ध आमचा रोष आहे. राजेंद्र चौधरी ज्या आघाडीत राहतील त्या आघाडीच्या व्यासपीठावर मी जाणार नाही मात्र वरणगावातील भाजपाच्या पाणीप्रश्‍नाला आपला पाठिंबा असल्याचे जगन सोनवणे यांनी कळवले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !