सांगोला ते नरखेड दरम्यान किसान लिंक पार्सल गाडी धावणार
भुसावळ : शेतकर्यांचा माल पाठवण्यासाठी सांगोला ते नरखेडदरम्यान किसान रेल गाडी चालवण्यात येणार आहे. ज्या शेतकर्यांना वा व्यावसायिकांना काही साधन सामुग्री पाठवयाची असेल त्यांनी आपल्या जवळच्या स्टेशनवर मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. डाऊन 00103 सांगोला ते नरखेड किसान पार्सल गाडी 15 डिसेंबर ते 29 डिसेंबरदरम्यान दर मंगलवारी सांगोला स्टेशनहुन 10.15 वाजता रवाना होईल आणि दुसर्या दिवशी नरखेड स्टेशनला 7.15 वाजता पोहोचणार आहे. डाऊन दिशेला या गाडीला मनमाड, भुसावळ, वरूड, ऑरेंज सिटी येथे थांबा देण्यात आला आहे. अप 00104 नरखेड ते सांगोला किसान पार्सल गाउी 17 ते 31 डिसेंबरदरम्यान दर गुरूवारी नरखेड स्टेशनहुन 11 वाजता रवाना होईल आणि दुसर्या दिवशी दौंड स्टेशनला 7.15 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला भुसावळ व मनमाड येथे थांबा देण्यात आला आहे. दहा व्हीपीयु बोगी या गाडीला जोडण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 00101/00102 नागपूर-आदर्शनगर-नागपूर किसान रेल गाडीला डब्बे नरखेड स्टेशन येथे जोडले व काढले जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.

