येवतीत वीज चोरी करणार्‍यांवर वीज कंपनीची धडक कारवाई


बोदवड : तालुक्यातील येवती येथे विद्युत मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करणार्‍यांविरुद्ध वीज कंपनीच्या पथकाने कारवाई केल्याने वीज चोरी करणार्‍यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी दिवसभरात वीज कंपनीच्या पथकाने कारवाई करीत अनधिकृतरीत्या खांब्यावरूनआकोडे टाकणार्‍यांसह तसेच मीटर बायपास करून कनेक्शन घेणार्‍यांसह विद्युत मीटरमध्ये फेरफार करणार्‍या 13 ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई मुक्ताईनगर वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. दरम्यान, वीज चोरी करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून वेळेच्या दंड न भरल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे अभियंता महेश पाटील यांनी सांगितले. कारवाईप्रसंगी वीज वितरण कंपनीचे उप अभियंता दीपक राठोड, संदीप पवार, कुलकर्णी, पाटील, उमर शेख, आतिष परदेशी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !