कुर्‍हा येथे तरुण शेतकर्‍याची आत्महत्या


मुक्ताईनगर : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्यातील कुर्‍हा येथील 27 वर्षीय तरुण शेतकर्‍याने स्वतःच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली. सागर गोपाळ गलवाडे (27) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. सततची नापिकी आणि त्यामुळे झालेले खाजगी कर्ज यामुळे आलेल्या नैराश्यातून सागर याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. मयत शेतकर्‍याच्या पश्चात आई, लहान भाऊ व दोन बहिणी असा परीवार आहे. सागर यांनी स्वतःच्या मालकीच्या पिंप्राळा शिवारातील शेतातील निंबाच्या झाडाला फाशी घेत मृत्यूला कवटाळल्याची घटना बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडलीत तर गुरुवारी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !