मैसूर-वाराणसी उत्सव विशेष ट्रेनला जानेवारीपर्यंत मुदतवाढ


भुसावळ : मैसूर-वाराणसी उत्सव विशेष ट्रेनच्या कालावधीत 30 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. डाऊन 06230 उत्सव विशेष ट्रेन 31 डिसेंबर ते 28 जानेवारीपर्यंत चालविण्यात येणार आहे. ही गाडी मैसूर येथून दर मंगळवार व गुरुवारी 07.20 वाजता सुटेल आणि वाराणसी येथे तिसर्‍या दिवशी सकाळी 8.15 वाजता पोहोचेल. या गाडीला मनमाडसह भुसावळ व खंडवा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अ 06230 उत्सव विशेष ट्रेन 2 ते 30 जानेवारीदरम्यान चालवण्यात येणार आहे. ही गाडी वाराणसी येथून दर गुरुवारी व शनिवारी 9.5 वाजता सुटणार असून मैसूर येथे तिसर्‍या दिवशी 11.15 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला खंडवा, भुसावळ, मनमाड रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. केवळ आरक्षीत तिकिट असलेल्या प्रवाशांच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार असून प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !