भुसावळात वरीष्ठ माहेश्वरी महिला मंडळाचा पदग्रहण सोहळा उत्साहात


भुसावळ : वरीष्ठ माहेश्वरी महिला मंडळाचा पदग्रहण सोहळा नुकताच माहेश्‍वरी भवनात पार पडला. समारंभात मावळत्या अध्यक्ष अयोध्या देवी मंत्री यांनी नूतन अध्यक्षा पुष्पा मंत्री यांना पदभार सोपवला तर उपाध्यक्षा सुरेखा धुप्पड, सचिव सविता दरगड, कोषाध्यक्ष लक्ष्मी चांडक यांनाही पदभार देण्यात आला.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास संस्थापीका सुशीलाबाई राठी, विा लाहोटी, राधा झंवर, राधा हेडा, राधिका लाहोटी, मुख्य अतिथी पुष्पा लड्ढा, माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा वीणा झंवर, जळगाव जिल्हाध्यक्ष राधा झंवर, एंजल इनरव्हील अध्यक्षा राधिका मंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संतोष हेडा, अरुणा काबरा, पुष्पा राठी, चित्रा झंवर, चित्रा भराडिया, योगिता झंवर, रत्ना धुप्पड, सुजाता मंत्री, नेहा मंत्री, मनीषा काबरा, किर्ती काबरा, राधा लाहोटी, अल्पना सोनी, आशा लाहोटी, नंदा लड्ढा आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन रीतीका हेडा, अलका काबरा तर आभार निशा मंत्री यांनी मानले. यावेळी दोन विद्यार्थ्यांना शालेय बॅग, पाण्याची बाटली, बुक व नोटबुक, पेन पुष्पा मंत्री यांनी दिले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !