बिबट्याच्या दर्शनाने निमगाव शिवारात शेतकर्‍यांमध्ये घबराट


यावल : तालुक्यातील निमगाव शिवारात शेतात बिबट्याचे दर्शन घडल्याने शेतकर्‍यांमध्ये भीती पसरली आहे. गुरूवारी पहाटेच्या सुमारास शेतकर्‍यांना बिबट्या दिसल्यानंतर वनविभागास माहिती कळवण्यात आली होती. वनविभागाचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी शेत-शिवारात पाहणी करीत बिबटचे पदमार्क (पायाचे ठसे) तपासले असून शेतकर्‍यांना सतर्क राहण्याच्या सुचना केल्या आहे.

निमगाव शिवारात दिसला बिबट्या
निमगाव, ता. यावल येथील शेतकरी अरुण जुलालसिंग पाटील यांच्या शेतात गुरूवारी पहाटे बिबट्या दिसल्यानंतर परीसरात खळबळ उडाली होती. याबाबत तत्काळ यावल प्रादेशिक वनविभागास माहिती देण्यात आली. वनक्षेत्रपाल व्ही.टी.पदमोर, वनपाल आर.सी.सोनवणे, आइ.एस.तडवी आदी दाखल झाले व त्यांनी बिबट्याचे पगमार्क (पायाचे ठसे) तपासले तसेच शेती शिवारात शेतकर्‍यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. शेत शिवारात वावरतांना प्रत्येकाने दक्ष रहावे व कुठे बिबट्या दिसल्यास तत्काळ वनविभागास माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !