श्री क्षेत्र मेहुणला उद्यापासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सोहळा


मुक्ताईनगर : तालुक्यातील श्री क्षेत्र मेहुण येथील श्री संत आदिशक्ती मुक्ताई देवस्थान येथे देवस्थानचे माजी अध्यक्ष वैकुंठवासी गुरुवर्य बाबूराव महाराज मेहुणकर यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त पंचदिन अखंड हरीनाम सप्ताह अंतर्गत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 16 ते 20 डिसेंबर 2020 दरम्यान हा सोहळा होणार आहे. पहाटे काकडा आरती, सकाळी व दुपारी ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरीपाठ आणि रात्री हरीकीर्तनाचा कार्यक्रम होईल. 16 रोजी भरत महाराज (म्हैसवाडी), 17 रोजी ज्ञानदेव महाराज (जांबुळधाबा), 18 रोजी मनोहरदेव महाराज (अंतुर्ली), 19 रोजी गोविंद महाराज चौधरी (केकतनिंभोरा) यांची कीर्तने होणार आहेत. 20 रोजी सकाळी 10 ते 12 वाजेदरम्यान ज्ञानेश्वर महाराज वाघ (भैरवगड) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. सप्ताहात विकास पाटील, मुरलीधर पाटील, भगवान पाटील, अंबादास बाठे, मीराबाई पाटील, सुरेश पाटील, प्रल्हाद पाटील, संदीप चौधरी, ज्ञानदेव वाघोदे यांच्यातर्फे अन्नदान केले जाणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई देवस्थान, श्री क्षेत्र मेहूण तापीतीर यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !