सावदा नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्या अपात्रतेला नगरविकास मंत्र्यांची तात्पुरती स्थगिती
सावदा : सावदा पालिकेचे नगरसेवक राजेंद्र श्रीकांत चौधरी यांच्या अपात्रतेला तात्पुरती स्थगिती देण्याचे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले आहे.
नगरसेवक चौधरी यांना तात्पुरता दिलासा
सावदा येथील नगरसेवक अजय भारंबे यांनी 6 फेब्रुवारी 2020 रोजी नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्याविरुद्ध जिल्हाधिकार्यांकडे तक्रारी केली होती. चौधरी यांनी 2001 ते आज पावेतो ते स्वत: नगरसेवक असताना 2011 ते 2016 दरम्यान पत्नी या नगराध्यक्षा असताना तर स्वत: चौधरी हे नगरसेवक देखील असताना चौधरी यांनी आपल्या स्वतःच्या कुटुंबातील घराचा माल मत्ताकर कमी करण्यासाठी पालिकेचे मालमत्ता कर रजिस्टर मध्ये फेरफार करून कुठल्याही कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केला नसल्याची तसेच खाडाखोड करून कमी रकमेची आकारणी निर्धारीत केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. यावर राजेंद्र चौधरी यांचे म्हणणे ऐकल्यावर जळगाव जिल्हाधिकारी यांनी 7 डिसेंबर रोजी नगरसेवक राजेद्र चौधरी यांनी अपात्र घोषित केले होते. या निर्णया विरोधात नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी शासनाचे नगरविकास मंत्र्यांकडे अपील केले होते. नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी 14 रोजी जळगाव जिल्हाधिकार्यांच्या आदेशास तात्पुती स्थगिती दिली असून यावर पुढे वेळ मिळेल तशी सुनावणी करण्यात येईल, असे आदेश दिले आहेत.

‘सत्य परेशान होता, है पराजीत नाही’
नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘भगवान के घर देर है, अंधेर नाही’ माझ्या राजकीय आयुष्याची सुरवात संघर्षामधून झाली असून आजही संघर्ष सुरू आहे व भविष्यातही सुरू राहिल. पद असो अगर नसो जनतेची कामे करीतच राहणार, सत्य परेशान होता है पराजीत नाही, असेही ते म्हणाले.

