वरणगाव पाणीपुरवठा योजनेसाठी उपोषण


भाजपाच्या उपोषणाला एक दिवसीय उपोषणाला वरणगावकरांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद : प्रशासनाने कामाला सुरुवात न केल्यास 23 डिसेबरला जलसमाधी आंदोलनाचा इशारा

भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथील पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपा पदाधिकार्‍यांनी मंगळवारी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण बसस्थानकाजवळ केले. या उपोषणाला भाजपा पदाधिकार्‍यांसह स्थानिक नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, योजनेचे काम सुरू होण्याच्या मागणीसाठी आता बुधवार, 23 डिसेंबर रोजी जलसमाधानी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

24 तास होणार होता पाणीपुरवठा
भाजपा सरकारच्या काळात 13 सप्टेंबर 2019 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नात 25 कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती मात्र आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर सरकारने ‘स्टे’ दिल्याने अडचणी वाढली त्यातच 5 जून रोजी वरणगाव नगरपरीषदेच्या सर्वसाधारण सभेत 7.77 दराने जास्तीची निविदा आल्याने विरोधी नगरसेवकांनी निविदा नामंजूर केल्याने पाणी योजनेचे काम थांबले. प्रशासनाने ही योजना तातडीने विनाविलंब सुरू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी वरणगाव बसस्थानकाजवळ लाक्षणिक उपोषण करण्यात आले. प्रशासनाने कामाला सुरुवात न केल्यास 23 डिसेंबर रोजी जलसमाधी आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.


यांचा उपोषणात सहभाग
या उपोषणात वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, पीआरपीचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे, राकेश भाई बग्गण, मिलिंद मेढे, मनोहर सराफ, सुनील माळी, अजय पाटील, संजय जैन, जावेद शहा, ज्ञानेश्वर घाटोळे, शामराव धनगर, अल्लाउद्दीन सेठ, युसूफ खान, अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, रमेश पालवे, गोलू राणे, अनिल वंजारी, कमलाकर मराठे, आकाश निमकर, संदीप भोई, शंकर पवार, महेश माळी, विशाल कुंभार, जय चांदणे, कृष्णा माळी, मिलिंद भैसे, पप्पू ठाकरे, भाऊलाल टिंटोरे, रमेश पालवे, तेजस जैन, अनंत माळी, किरण वंजारी, योगेश रमेश माळी, कुंदन माळी, गोलू निंबाळकर, हितेश चौधरी, विक्की मेढे, रुपेश मेढे, आकाश मेढे, प्रदीप चौधरी, अरुण बावणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

पाण्यात राजकारणाचे पाप : जगन सोनवणे
प्रसंगी जगन सोनवणे म्हणाले की, राष्ट्रवादीने ज्या पाणीपुरवठा योजनेला विरोध केला त्यांच्याविरुद्ध नगरपरीषद निवडणुकीत विरोधात प्रचार करण्यासाठी निश्‍चित मी येणार असून पाण्याला विरोध करणे म्हणजे महापाप असल्याचे ते म्हणाले. नगराध्यक्ष सुनील काळे यांनी वरणगाव शहरात केलेला 70 कोटी रुपये खर्चातून विविधांगी कामे केल्याने शहराचा चेहरा-मोहरा बदलला आहे. आपल्या आक्रमक शैलीत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. वरणगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी शामकांत गोसावी, वरणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी उपोषणास्थळी भेट दिली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !