कर्तव्यदक्ष महिला शिक्षिका व सरपंच यांचा सन्मान
खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा महिला आघाडीतर्फे सत्कार
वरणगाव : शहरातील मराठा समाज बहुउद्देशीय संस्थेच्या सामाजिक सभागृहात जळगाव जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे महिला शिक्षिका व महिला सरपंच यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त जळगांव जिल्हा महिला आघाडी या अध्यक्षा कल्पना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी त्यांनी पवार साहेबांचे महिलांसाठी केलेले कार्य व कायदे याविषयीची विस्तृत माहिती दिली.
यांचा झाला सन्मान
यामध्ये ज्ञानदायीनी गौरव देऊन महिला शिक्षिका मीरा जंगले (जि.प.शाळा सुसरी), संगीता संजय चौधरी (सु.रा.कदम प्रा.वि.वरणगाव), व्ही.के.चव्हाण, एस.जी.चौधरी (महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव), नलिनी बाविस्कर (के.नारखेडे विद्यालय, भुसावळ), शारदा मधुकर सुरवाडे (जि.प.शाळा, पिंपळगाव खुर्द) तर प्रतिभावंत महिला सरपंच म्हणून मालती रामदास पारधी (जाडगाव), नीता सचिन इंगळे (हतनूर), वैशाली हरी टाकोळे (फुलगाव), सुरेखा रामराव पाटील (अंजनसोंडे), जयश्री काशीनाथ वराडे (काहूरखेडे) यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ तालुका महिला अध्यक्षा नंदा निकम, मीनाक्षी चव्हाण, पिनाज फनिबंदा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, भुसावळ तालुकाध्यक्ष दीपक मराठे, युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटील, वरणगाव राष्ट्रवादी शहराध्यक्ष संतोष माळी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश निकम, रवी पाटील आदी उपस्थित होते.


