विहिंप साधणार 30 दिवसात दोन लाख कुटुंबियांशी संपर्क
भुसावळात अभियानाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
भुसावळ : अयोध्येतील भव्य राम मंदिर निर्माण करण्यासाठी विश्व हिंदू परिषद 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान देशभरात संपर्क अभिमान राबविणार आहे. या अभियानात जमा होणार्या निधीद्वारे राम मंदिर उभे राहणार आहे. राम मंदिर हे सामान्यांना आपलेसे वाटावे म्हणून हे आंदोलन सुरू केले आहे. हे राम मंदिर आंदोलनातील शेवटचे आंदोलन आहे. या आंदोलनात देशातील 11 कोटी परीवाराशी संपर्क करण्यात येणार आहे. त्यात भुसावळ तालुक्यातील दोन लाख परीवारापर्यंत हे आंदोलन पोहोचणार आहे. यासाठी निधी संकलन व्हावे म्हणून मंगळवारी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
बलिदानानेच राष्ट्र सुरक्षित : जनार्दन महाराज
देशातील साधू संत नेहमी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. राम मंदिर आंदोलनात जेव्हा-जेव्हा संतांनी आव्हान केले त्या-त्या वेळी समाज एकत्र येऊन आंदोलन यशस्वी केले. आजपर्यंत अनेक वीरांनी बलिदान केले म्हणून आंदोलन यशस्वी झाले. हा देश बलिदानाने सुरक्षित आहे. जेव्हा धर्मावर आक्रमण झाले तेव्हा संतांच्या आवाहनानंतर समाज पुढे आला आणि बलिदान केले. यापुढे येणार्या प्रत्येक आंदोलनात संत तन, मन व धनाने पुढे राहतील याची ग्वाही जनार्दन महाराजांनी दिली.

यांची होती उपस्थिती
यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, भक्तीप्रसाद दासजी महाराज, सिंधू दीदी, गोपाळ चैतन्य महाराज, हरणे महाराज, विहिंपचे जिल्हा मंत्री योगेश भंगाळे, शहराध्यक्ष श्रीकांत लाहोटी, बजरंग दल जिल्हा संयोजक विक्की भिडे, सहसंयोजक गोपी राजपूत, विनोद उबाळे, उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रांत सत्संग प्रमुख नारायण घोडके तर आभार प्रशांत वैष्णव यांनी मानले. योगेंद्र हरणे, दिलीप कलाल, प्रशांत देवरे आदींनी सहकार्य केले.

