मुंबई-गुवाहाटी व कामाख्यासाठी धावणार विशेष गाडी
भुसावळ : रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई-कामाख्या व मुंबई-गुवाहाटी दरम्यान विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
मुंबई-कामाख्या सुपरफास्ट विशेष गाडी (साप्ताहिक)
अप 02256 मुंबई-कामाख्या सुपरफास्ट विशेष गाडी 26 डिसेंबरपासून दर शनिवारी सहा वाजता कामाख्याहून सुटल्यानंतर तिसर्या दिवशी 9.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनल्सला पोहोचणार आहे. या गाडीला अकोला, भुसावळ, मनमाड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. डाऊन 02255 डाउन विशेष दिनांक 29.12.2020 पासून प्रत्येक मंगलवार ला लोकमान्य तिलक टर्मिनस हुन 13.15 वाजता रवाना होईल आणि तिसर्या दिवशी 3.25 वाजता कामाख्याला पोहोचणार आहे. या गाडीला मनमाड, भुसावळ, अकोला, नागपूर, गोंदिया, रायपूर, बिलासपूर, रायगढ, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर, खडकपूर, दनकुनी, बर्धमान, बोलपूर शांतीनिकेतन, रामपुर टाउन, न्यू जलपाईगुडी, सिलिगुडी जंक्शन, हसीमारा, अलीपुरद्वार जंक्शन, न्यू बोंगाईगाव येथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक एसी टू टीयर, पाच एसी थ्री टीयर, 10 स्लीपर क्लास, तीन द्वितीय श्रेणी सिटींग व एक पेंट्री कार जोडण्यात येणार आहे.

मुंबई-गुवाहाटी विशेष गाडी (साप्ताहिक)
अप 05648 स्पेशल 22 डिसेंबरपासून दर मंगळवारी तीन वाजता गुवाहाटीहुन रवाना होईल आणि तिसर्या दिवशी 5.50 वाजता लोकमान्य तिलक टर्मिनल्सला पोहोचणार आहे. या गाडीला खंडवा, बर्हाणपूर, भुसावळ, मनमाड व नाशिक स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. डाऊन 05647 विशेष गाडी 25 मे पासून दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनसहुन 8.05 वाजता रवाना होईल आणि तिसर्या दिवशी एक वाजता गुवाहाटी पोहोचणार आहे. या गाडीला नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, बर्हाणपूर, खंडवा, हरदा, इटारसी, पिपरीया, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पं.दीनदयाल उपाध्याय जंक्शन, दिलदारनगर जंक्शन, बक्सर, डुमरांव, आरा, दानापुर, पटना जंक्शन, पटना साहिब, फतुहा, खुसरोपुर, बख्तियारपुर जंक्शन, बरह, मोकामा, हाथीदह जंक्शन, लक्कसराय जंक्शन, किऊल जंक्शन, बरीयारपूर, सुल्तानगंज, भागलपूर, कहलगाव, साहिबगंज जंक्शन, बरवावा जंक्शन, नया फरक्का जंक्शन, मालदा टाउन, किशनगंज, न्यू जलपाईगुड़ी, धौलागुरी, न्यू कूचबिहार, न्यू अलीपुरद्वार, न्यू बोंगईगांव, बारपेटा रोड, रंगिया जानपुर रोड, रंगिया जंक्शन, कामाख्या जंक्शनवर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक टू टीयर, पाच एसी थ्री टीयर, 13 स्लीपर क्लास, चार सेकंड क्लास सीटिंग व एक पँट्री कार डबा जोडण्यात येणार आहे. केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार असून प्रवाशांना कोविड 19 नियमांचे पालन करावे लागणार आहे.

