भुसावळात पुन्हा बंद घर फोडले


30 हजारांचा ऐवज लंपास : बंद घरांना चोरटे करताय टार्गेट

भुसावळ : शहरात बंद घरांना चोरटे टार्गेट करीत असल्याने रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे. शहरातील लक्ष्मी नारायण नगरातील रहिवासी अलिशान नथ्थू तडवी (लक्ष्मी नारायण नगर, 32 खोलीजवळ, भुसावळ) हे कुटुंबासह 12 ते 16 डिसेंबरदरम्यान बाहेरगावी गेल्याने चोरट्यांनी संधी साधत 30 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला. बुधवारी ते घरी परतल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा तोडत कपाटातील चार ग्रॅमच्या लहान मुलांच्या चार अंगठ्या तसेच चांदीचे पायातील वाळे व पैंजन आदी मिळून 30 हजारांचा एैवज लांबवला. बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जयेंद्र पगारे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !