भुसावळ रेल्वे स्थानक निरीक्षक दिनेश नायर यांची बदली
भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकावरील आरपीएफ निरीक्षक दिनेश जी.नायर यांची सोलापूर विभागात बदली करण्यात आली असून त्याबाबतचे आदेश आरपीएफ महासंचालक अतुल पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली पीसीएससी स्टाफ अधिकारी प्रेमनाथ नाथ राय यांनी 15 डिसेंबर रोजी काढले आहेत. अतुल पाठक यांच्या बदलीसंदर्भात डीएससी क्षितीज गुरव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बदली झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला तसेच कार्यकाळ पूर्ण झाल्याने ही बदली झाल्याचे सांगितले. दरम्यान, नायर यांच्या जागी अद्याप कुणाचीही नियुक्ती करण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

