चांगली नोकरी हवीय, तर महाविद्यालय योग्य निवडा


डॉ.राहुल बारजिभे यांचा विद्यार्थी व पालकांना सल्ला : शिक्षण पूर्ण होताच संधी उपलब्ध

भुसावळ : विद्यार्थ्यांनी इंजिनिअरींगच्या चांगल्या महाविद्यालयाची निवड करणे आवश्यक आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करताच कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून लोकरीच्या संधी उपलब्ध होतील, असा सल्ला डॉ. राहुल बारजिभे यांनी विद्यार्थी व पालकांना दिला. श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रवेशाच्या किती फेर्‍या होणार आहे? कशा होणार आहे? कधीपर्यंत चालतील? याबाबत सविस्तर मार्गदर्शन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य डॉ. राहुल बारजीभे, प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, मान्यवरांनी दिले. पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन मान्यवरांनी केले.

प्राध्यापकांचे मार्गदर्शन घेऊन शाखा निवड करणे योग्य
प्रवेश घेण्याआधी एक चांगला उपाय म्हणजे विद्यार्थ्यांनी जमेल तशी काही संस्थांना प्रत्यक्ष भेट द्यावी, नुकतेच उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची भेट घ्यावी व चर्चा करावी, हे अधिक चांगले. चर्चेद्वारे संस्थेस मिळालेले अधिकृत प्रमाणपत्र, शिक्षणास पोषक वातावरण, अर्हता व अनुभवप्राप्त शिक्षकांची पुरेशी संख्या व शिकवण्याचा एकंदरीत दर्जा, प्रयोगशाळांची व ग्रंथालयाची अवस्था, अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याबद्दल माहिती, गेल्या तीन वर्षांचे निकाल, नोकर्‍या देणार्‍या कोणत्या कंपन्या संस्थेमध्ये येतात व किती जणांना, किती वेतनाच्या नोकर्‍या लागल्या, अन्य सोयीसुविधा या निकषांची चौकशी करावी याबरोबरच प्रयोगशाळेतील प्रयोग, परिसंवाद, छोटे-मोठे अभियांत्रिकी प्रकल्प, सुट्टयांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण, निरनिराळ्या कंपन्यांना भेटी यामध्येही विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग पाहिजे. निरनिराळ्या विद्याशाखांची माहिती घेऊन वा योग्य जाणकार समुपदेशकाचे, महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन घेऊन शाखा निवड करणे कधीही योग्य असते, अशी माहिती डॉ.बारजिभे यांनी दिली.


भारतातील कंपन्याही परदेशात शाखा : डॉ.सिंह
सर्व प्रगत देशांमधील बहुराष्ट्रीय कंपन्या देशात आल्या आहेत. येत्या काही वर्षांत शेकडोंच्या संख्येने येणारही आहेत. त्यांना सर्वच विद्याशाखांच्या खूप सार्‍या अभियंत्यांची गरज भासणार आहे. भारतातील कंपन्याही परदेशात आपल्या शाखा उघडत आहेत किंवा तेथील उद्योग विकत घेत आहेत, त्यांनाही सुयोग्य मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. तेव्हा नोकरी-व्यवसाय या दृष्टीने सुकाळ असे म्हणायला हरकत नाही. श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिकताना नोकरीसाठी आवश्यक विविध प्रकारच्या कौशल्य वाढीवर उपाययोजना केल्या जातात म्हणून शिक्षण पूर्ण होताच नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देत आहे असे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी सांगितले.

म्हणूनच महाविद्यालयात प्रवेश : विपुल बोंडे
महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम विभागाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले प्रकल्प स्वतः बघितले, येथे असलेल्या सोयी सुविधा, रोजगाराच्या संधी, शिक्षण पद्धती बघूनच श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेणार असल्याचे विपुल बोंडे या विद्यार्थ्यांने सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !