शेतकरी आंदोलनामुळे नांदेड-अमृतसर विशेष गाडी शॉर्ट टर्मिनेट
भुसावळ : शेतकरी आंदोलनामुळे गाडी क्रमांक 02715/16 नांदेड-अमृतसर-नांदेड विशेष गाडी शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे. डाऊन 02715 डाऊन-नांदेड-अमृतसर विशेष गाडी 16 डिसेंबर रोजी नांदेडस्टेशन वरून निघाल्यानंतर अमृतसर स्टेशन ऐवजी न्यू दिल्ली स्टेशनवर शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे. अप 02716 अमृतसर-नांदेड विशेष गाडी 18 डिसेंबर रोजी अमृतसर स्टेशनऐवजी नवी दिल्लीस्टेशन पासून रवाना होणार आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

