तीन तालुक्यातील ऑनलाईन सात बारा उतार्यांचा जिल्हाधिकार्यांकडून आढावा
भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयात बैठक : वसुली वाढवण्याच्या सूचना
भुसावळ : भुसावळ, मुक्ताइनगर, बोदवड तालुक्यातील सात बारा ऑनलाईन उतार्यांचा जिल्हाधिकार्यांनी बुधवार येथे आढावा महसूल उद्दिष्टपूर्तीसाठी वसुली वाढवण्याच्या सूचना केल्या. जिल्हाधिकारी अभिजीत राऊन यांनी बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाला भेट देत दुपारी 12 वाजता विभागीय बैठक घेतली.
यांची होती उपस्थिती
यावेळी बैठकीला अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, तहसीलदार दीपक धीवरे, मुक्ताईनगर तहसीलदार श्वेता संचेती, बोदवड तहसीलदार हेमंत पाटील यांच्यासह तिन्ही तालुक्यातील नायब तहसीलदार, मंडळाधिकारी यांची उपस्थिती होती.


