लोणवाडीतील तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या
बोदवड : तालुक्यातील लोणवाडी येथील निलेश अशोक निंबाळकर (29) या तरुणाने विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या केली. या प्रकरणी अद्याप बोदवड पोलिसात गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले. निलेश निंबाळकर या तरुणाने शनिवार, 12 डिसेंबर रोजी विषारी द्रव्य सेवन केल्याने त्याच्यावर जळगाव जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचार सुरू असतानाच मंगळवारी रात्री निलेशचा मृत्यू झाला. दरम्यान, निलेशला आत्महत्येस प्रवृत्त करणार्या वर गुन्हा दाखल करावा अशी मागणी निलेशच्या वडिलांनी केली आहे.

