फैजपूर सिमेंट काँक्रिट ट्रीमीक्स रस्ता कामाने समाधान
फैजपूर : फैजपूर शहरातील शिवाजी नगर भागातील ज्येष्ठ नागरीक संघ ते फैजपूर बसस्थानकापर्यंत सिमेंट काँक्रीट ट्रिमीक्स रस्त्याच्या कामाला नव्याने नुकतीच सुरुवात झाल्याने या भागातील नागरीकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
वाहनधारकांना मोठा दिलासा
फैजपूर शहरातील शिवाजी नगर भागातील ज्येष्ठ नागरीक संघापासून ते फैजपूर बस स्थानकापयर्यंत रस्त्याचे काम गेल्या दहा वर्षांपूर्वी करण्यात आले होते. कालांतराने या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे या रस्त्याच्या कामाची मागणी पुढे आली होती. या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी रस्त्याची लेव्हल करून त्यात संपूर्ण स्टील (आसारी) वापरून त्याची बांधणी करून त्यावर सिमेंट वापर करून काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. या कामाची पाहणी बांधकाम सभापती हेमराज चौधरी, काँग्रेस गटनेता कलिम खां मण्यार, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता शेख कुर्बान, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र होले, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, प्रभाकर सपकाळे यांनी केली.


