भुसावळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव


वाढदिवसानिमित्त लायन्स क्लब पदाधिकार्‍यांनी केला सत्कार

भुसावळ : भुसावळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गुरुवारी वाढदिवस असल्याने त्यांच्यावर दिवसभर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दूरध्वनीवरून, सोशल मिडीयावरून तसेच प्रत्यक्ष भेटून शुभेच्छांचा वर्षाव केला. याप्रसंगी लायन्स क्लबच्या पदाधिकार्‍यांनी भोळे यांचा बुके देऊन सन्मान केला. यावेळी उमेश पाटील, राजेश पाटील, विनय बढे, गिरीष पाटील, किरण सरोदे आदींची उपस्थिती होती.

नगरसेवकांनी केला शुभेच्छांचा वर्षाव
नगराध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळातील भाजपा पदाधिकार्‍यांनी भोळे यांचा बुके देवून केक कापून शुभेच्छांचा वर्षाव केला. प्रसंगी नगरसेवक किरण कोलते, युवराज लोणारी, राजेंद्र नाटकर, निकी बत्रा, रमेश नागराणी, मुन्ना तेली रमेश मकासरे, पिंटू कोठारी, अ‍ॅड.बोधराज चौधरी, किशोर पाटील, दिनेश नेमाडे, वसंत पाटील, सतीश सपकाळे, प्रा.सुनील नेवे, अमोल इंगळे, देवा वाणी, राजू सूर्यवंशी, रवी सपकाळे, बापू महाजन, अ‍ॅड.निर्मल दायमा, सोनू मांडे, केदार ओक, प्रशांत देवरे, पवन बुंदेले, अमोल महाजन, शेखर इंगळे, महेश कोंडे, विद्यानंद स्वामींचे शिष्यगण, ज्ञानेश्‍वरी मंडळाचे पदाधिकारी, पितांबर टेकवानी, वासुभाऊ बोंडे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, बापू मांडे, आमदार राजू मामा भोळे, माजी आमदार नीळकंठ फालक, यावल-रावेर भागातील भाजपा पदाधिकार्‍यांनी दूरध्वनीवरून नगराध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !