कर थकवला : रावेर तालुक्यातील जीटीएल कंपनीचे 11 टॉवर सील
इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान : जिल्हाधिकार्यांकडे तक्रार
रावेर : महसूल विभागाचा कर थकविल्याप्रकरणी रावेरच्या महसूल विभागाने रावेर तालुक्यातील जीटीएल कंपनीचे अकरा टॉवर सील केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने विद्यार्थ्यांसह नेटकर्यांना मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे. जि.प.चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी या संदर्भात जिल्हाधिकार्यांकडे तक्रार करून तातडीने हा तिढा सोडवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
महसूल विभागाची तब्ब सहा लाख 23 हजारांचा कर थकबाकी न भरल्याने महसूल प्रशासनाने 11 मोबाईल टॉवर सील केल्याने इंटरनेट सेवा विस्कळीत झाली असून संपर्क साधण्यासदेखील अडचणी निर्माण झाल्या आहेत. जि.प.चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी या संदर्भात जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली आहे. तांदलवाडी हे साडेपाच हजार लोकवस्तीचे गाव असून मोबाईल टॉवर सीलमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकावे लागले आहे तर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 23 पासून प्रक्रिया सुरू होणार असल्याने जातीचे दाखले व अन्य कागदपत्रे काढण्यास त्यामुळे अडचण येणार असल्याने मोबाईल कंपनी व प्रशासनातील तिढा सोडवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.


