इंण्डस कंपनीचे 34 टॉवर सीलचे आदेश


रावेर : जीटीएल कंपनीचे 11 टॉवर सील करण्यात आल्यानंतर महसूल प्रशासनाने इंण्डस कंपनीचे 34 टॉवर सील करण्याबाबत आदेश काढल्याने रावेर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. महसूल प्रशासनाच्या माहितीनुसार, महसूल कर भरण्यासाठी नोटीस देऊन सुध्दा संबधित कंपन्या कर भरण्यासाठी दिरंगाई करीत असून धडक कारवाई केली जात आहे. शासनाकडून महसूल कर वसूल करण्याचे स्थानिक प्रशासनाला आदेश असल्याने महसूल कर वसुली संदर्भात तहसील प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली. मार्च एण्डपूर्वीच रावेर तालुक्यात धडक कारवाई केली जात असून आज रोजी इंण्डस कंपनीकडे महसूल प्रशासनाची तब्बल 19 लाख 50 हजार रुपयांची थकबाकी आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !