भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर दत्तक घ्या


भुसावळचे शिशिर जावळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

भुसावळ : सध्या भुसावळसह जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून मृत्यु दरही वाढत आहे. सिव्हिल हॉस्पिटल, जळगाव, भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर, यासह सर्वच खाजगी व शासकीय दवाखान्यांमध्ये कोविड रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटरमध्ये प्रचंड असुविधा असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. गोरगरीब जनतेसाठी भुसावळ ग्रामीण रुग्णालय ट्रामा सेंटर बांधण्यात आले मात्र त्या ठिकाणी पुढील अनेक सुविधा असल्याने जनतेमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. कोविड रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. या अनुषंगाने भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर दत्तक घ्यावे, अशी मागणी भुसावळचे शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

असुविधांमुळे रुग्ण त्रस्त
भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर मध्ये ऑक्सीजन व्हेंटिलेटर उपलब्ध असून सुद्धा त्या संदर्भात तज्ञ डॉक्टर नाहीत, एक्स-रे टेक्निशियन नाहीत, पुरेसा स्टॉप कर्मचारी सुरक्षारक्षक नाहीत, रुग्णालयाच्या सुरक्षिततेसाठी कुठलेही प्रतिबंधात्मक उपकरणे नाहीत, पुरेश्या टेबल-खुर्च्या डस्टबीन नाहीत, औषधे ठेवण्यासाठी स्टोरेजसाठी कपाटं नाहीत, कोरोना रुग्णांना पिण्यासाठी वा आंघोळीसाठी गरम पाणी नाही, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रुग्णांना रेग्झिन बेडवर झोपायला लागत असल्याने त्यांना बेडशीट्स सुद्धा उपलब्ध करुन दिलेले नाहीत, रुग्णालयातील सर्व दरवाजे व खिडक्या त्यांना आवश्यक असे पडदे नाहीत, सीसीटीव्ही यंत्रणा नाही, रुग्णालयाची स्वच्छतेसाठी आवश्यक अशी साधन सामुग्री नाही पुरेसा स्टॉप सुद्धा नाही. कोविड लसीकरणासाठी व त इतर रुग्णसेवा घेण्यासाठी येणार्‍या रुग्णांना बसण्यासाठी खुर्च्यांना ही त्यांची प्रचंड गैरसोय होते, विविध लसी आणि औषधी साठा ठेवण्यासाठी आवश्यक असणार्‍या रेफ्रिजेटर नाहीत, सॅनेटायझर नाही मास्क नाही शिवाय पुरेसा औषधसाठा उपलब्ध नाही, संपूर्ण रुग्णालयाची मदार बोटावर मोजण्याइतके डॉक्टर्स आणि कर्मचार्‍यांवर अवलंबून आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा जळगाव जिल्हा प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे. भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर मधील या असुविधांमुळे 3 कोविड रुग्णांना काही दिवसांपूर्वी जीव गमवावा लागलेला आहे. या समस्या सुटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सदर सुविधांनी युक्त असे रुग्णालय दत्तक घ्यावे व त्या ठिकाणी योग्य सुविधा आणि कर्मचारी पुरवावेत यासाठी सदर रुग्णालय व ट्रामा सेंटर कायमस्वरूपी दत्तक घ्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर दिनकर जावळे यांनी मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.


कॉपी करू नका.