Nawapur contract coordinator Nandurbar in ACB net नवापूरचा कंत्राटी समन्वयक नंदुरबार एसीबीच्या जाळ्यात

दहा हजारांची लाच भोवली : बदलीसह करार नूतनीकरणासाठी मागितली लाच


Nawapur contract coordinator Nandurbar in ACB net नवापूर : कराराचे नुतनीकरण तसेच सोयीच्या बदलीसाठी दहा हजारांची लाच मागणी नवापूर पंचायत समितीतील कंत्राटी समन्वयकाला चांगलीच महाग पडली आहे. सोमवारी दुपारी नंदुरबार एसीबीच्या पथकाने लाच मागणी प्रकरणी संशयीताला अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली. दिनेश दिलीप भामरे (36, प्रभाग समन्वयक, चिंचपाडा, कंत्राटी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

लाच मागणी भोवली
38 वर्षीय तक्रारदार या प्रभाग समन्वयक म्हणून काम करतात. त्यांचा अकरा महिन्याचा कंत्राट संपत असल्याने या कराराचे नूतनीकरण करणे व बदली सोयीच्या ठिकाणी बदली करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परीषद नंदुरबार अंतर्गत पंचायत समिती, नवापूर येथे कंत्राटी तत्वावर कार्यरत दिनेश दिलीप भामरे (36, प्रभाग समन्वयक, चिंचपाडा, कंत्राटी) याने दहा हजारांची लाच मागितली मात्र तक्रारदाराने त्याबाबत नंदुरबार एसीबीला तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला मात्र लाच स्वीकारण्यात आली नाही. 22 ऑगस्ट रोजी ही घटना घडली मात्र लाच मागणीचा अहवाल प्राप्त होताच सोमवारी दुपारी नवापूर पंचायत समितीतून आरोपीला अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
नंदुरबार एसीबीचे पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस निरीक्षक माधवी समाधान वाघ, हवालदार विलास पाटील, हवालदार ज्योती पाटील, हवालदार विजय ठाकरे, नाईक देवराम गावीत, नाईक मनोज अहिरे, नाईक संदीप नावडेकर, नाईक अमोल मराठे, नाईक जितेंद्र महाले आदींच्या पथकाने आरोपीला अटक केली.


कॉपी करू नका.