गोलाणी मार्केटमधील मोबाईल दुकान फोडून सहा लाखांचे मोबाईल लांबवले


Cell phones worth six lakhs were stolen after breaking into a mobile shop in Golani market जळगाव : शहरातील गजबजलेल्या गोलाणी मार्केटमधील श्री एसएसडी मोबाईलमधून चोरट्यांनी सहा लाख 26 हजारांचे मोबाईल लांबवले. बुधवारी सायंकाळी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या चोरट्यांनी महागडे सहा मोबाईल, अ‍ॅपल वॉच तसेच इतर साहित्य लांबवले.

चोर्‍यांमुळे उडाली खळबळ
जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परीसरात गणेश नगरात विनीत कैलासकुमार आहुजा हे वास्तव्यास आहेत. त्यांचे गोलाणी मार्केट येथे वाघ चेंबर दुकान 2 येथे एस.एस.डी. मोबाईल नावाचे दोन मजली दुकान आहे. विनीत व त्यांचा लहान भाऊ रोहित हे दोघे दुकान सांभाळतात 20 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता रोहित आहुजा हे दुकान बंद करुन घरी निघून गेले. दुसर्‍या दिवशी बुधवार, 21 सप्टेंबर रोजी आहुजा यांच्या दुकानाच्या शेजारी असलेल्या ऑल ईन वन स्टोअर्सचे चे मालक जयेश पोपटानी यांनी विनीत आहुजा यांना फोन करुन त्यांच्या दुकानाचे गेटचे लॉक तोडले असल्याचे दिसत असून दुकानात चोरी झाल्याचे सांगितले.

पोलिसांकडून चोरट्यांचा शोध
विनीत व त्यांचा भाऊ यांनी दुकानाकडे धाव घेतली. पाहणी केली असता, दुकानातील चॅनल गेटच्या लॉकच्या पट्टया तोडून शॉपमध्ये प्रवेश करत चोरट्यांनी वरच्या मजल्यावरील शॉपमधून विक्रीस असलेले महागडे सहा मोबाईल, दोन अ‍ॅपल वॉच, एक एअर पॉट तसेच डीव्हीआर बॉक्स तसेच सहा हजार रुपयांची रोकड असा एकूण सहा लाख 26 हजारांचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे समोर आले. याबाबत विनीत आहुजा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात दोन चोरट्यांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


कॉपी करू नका.