A 32-year-old youth from Faizpur committed suicide by hanging himself फैजपूरातील 32 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0

A 32-year-old youth from Faizpur committed suicide by hanging himself यावल : तालुक्यातील फैजपूर शहरातील जगनाडे नगरातील रहिवासी असलेल्या 32 वर्षीय तरुणाने राहत्या घरात दोरीच्या साह्याने गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येतात तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली व या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
फैजपूर शहरातील जगनाडे नगरात घनश्याम भागवत नेमाडे (32) हा तरुण वास्तव्यास होता व एकटाच असताना व त्याने आपल्या राहत्या घरात मधल्या रूमच्या स्लॅबला लोखंडी आसारीला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास येतच तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. त्याचा मृतदेह शवविच्छेदना करीता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक उमेश चौधरी करीत आहेत. तरुणाने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही.


error: Content is protected !!